Tokre Koli Community | रावेर तालुक्यात ‘टोकरे कोळी’ ओळखीसाठी मोठा निर्णय! वाघोदा खुर्द बैठकीत ठराव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tokre Koli Community वाघोदा खुर्द | साक्षीदार न्यूज |आदिवासी कोळी बहुउद्देशीय शिखर संस्था, रावेर यांच्या वतीने दि. ७ एप्रिल २०२६ रोजी वाघोदा खुर्द येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत रावेर तालुक्यातील विविध सामाजिक व संघटनात्मक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान संस्थेचा प्रसार व प्रचार कसा वाढवावा, तसेच सदस्यसंख्या वाढीसाठी कोणते उपाययोजना राबवाव्यात यावर विचारमंथन झाले. यासोबतच निवडणूक आयोगाशी संबंधित सुरू असलेल्या SRI याद्यांबाबत चर्चा करण्यात आली. महत्त्वाच्या निर्णयांपैकी आगामी जनगणनेत आपल्या समाजाची नोंद “टोकरे कोळी” म्हणून व्हावी, यासाठी संपूर्ण रावेर तालुक्यात व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या बैठकीत संस्थेचे सल्लागार अशोक कोळी यांच्या चिरंजीवांची पुणे येथे आयटी क्षेत्रात उच्च पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

- Advertisement -

Tokre Koli Community

बैठकीस संस्थेचे संचालक मंडळ व जेष्ठ सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये श्री. संतोष सपकाळे (आप्पा सिंगत), श्री. हरिलाल भाऊ कोळी (कांडवेल), अध्यक्ष मनोहर कोळी (सुलवाडी), उपाध्यक्ष विनोद कोळी (शिवा भाईजी, पुनखेडा), सचिव योगेश्वर कोळी, सुभाष सपकाळे (सर, सुनोदा), विनोद कोळी (नेहता), गोपाळ कोळी (खिरवड), विक्की कोळी (चोरवड), भुषण तायडे (रावेर), ईश्वर कोळी (चिनावल), अशोक कोळी (वाघोदा खुर्द), सुपडु कोळी (थोरगव्हाण), शरद कोळी (आंदलवाडी), विजय कोळी (अजनाड) आदी मान्यवरांचा समावेश होता. तसेच वाघोदा खुर्द येथील चुडामण सपकाळे, चिराग कोळी, बाळु कोळी, दिपक कोळी, तुषार कोळी, दिपक तायडे, रवींद्र कोळी, राजेंद्र कोळी, शंकर कोळी, धोंडु कोळी, कैलास सपकाळे (सुनोदा), तुळशीराम सपकाळे (मस्कावद) यांच्यासह समस्त आदिवासी टोकरे कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tokre Koli Community

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Hindu Janjagruti Samiti | 77 युवती बनल्या स्वसंरक्षणात पारंगत!...

Hindu Janjagruti Samiti | जळगाव | साक्षीदार न्यूज | हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हर घर योद्धा अभियान’ अंतर्गत दादावाडी परिसरातील श्री अष्टभुजा माता मंदिर, पिंप्राळा...

Jalgaon MIDC Police | शेतकऱ्यांच्या केबल चोरीचा पर्दाफाश! एमआयडीसी...

Jalgaon MIDC Police जळगाव | साक्षीदार न्यूज | शेतकऱ्यांच्या विहिरी व बोरवेलवरील विजेच्या केबल चोरी प्रकरणात एम.आय.डी.सी. पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक...

Jalgaon ZP CEO Transfer | बिग ब्रेकिंग! मिनल करनवाल...

Jalgaon ZP CEO Transfer जळगाव | सुनिल भोळे | जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची बदली करण्यात आली असून, त्यांची नियुक्ती मुंबई...

RECENT NEWS