ट्रक मागे घेताना अनर्थ : सुरक्षा रक्षकाचा मृत्यू !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २४ नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरानजीक असलेल्या एमआयडीसी भागात एम सेक्टरमधील कंपनीतून माल उतरविण्यासाठी आलेला ट्रक मागे घेत असताना सुरक्षा रक्षकाला धडक लागली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. सुकदेव आनंदा सापकर (वय ६५, रा. तुळजाईनगर कुसुंबा) असे मृत झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील एम सेक्टरमधील जीबी इंडस्ट्रीजमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी तर कुसुंबा येथे सुकदेव सापकर हे वास्तव्यास असून कंपनीत (एमएच २८ बीबी ५३९९) क्रमांकाच ट्रक माल उतरविण्यासाठी आला होता. ट्रक चालक हा ट्रक मागे घेत असतांना कंपनीच्या गेटवर ड्युटी करीत असलेल्या सापकर यांना ट्रकची धडक लागल्याने ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, कामगारांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सापकर यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS