साक्षीदार | २६ नोव्हेबर २०२३ | नांदगाव ते मनमाडदरम्यान शुक्रवारी सायंकाळी जळगाव शहरातील एका परिसरातील २८ वर्षीय तरुण धावत्या रेल्वेतून पडल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
- Advertisement -
जळगाव शहरातील शनी पेठ परिसरतील गवळीवाडा येथील रहिवासी राहुल रामदास गवळी (वय २८) हा तरुण हातमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होता. शुक्रवारी रेल्वेतून प्रवास करीत असताना तोल जाऊन तो रेल्वेतून खाली पडला. डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्टेशन प्रबंधक यांनी रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाची ओळख पटवून मृतदेह जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला
- Advertisement -