Dharangaon Sand Depo ; एकाच दिवसात शेकडो ब्रास वाळू वाहतूक मात्र धरणगाव येथील डेपो वर मात्र ३ ट्रीप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

नांदेड (ता.धरणगाव) येथील वाळू लिलावावर गावकऱ्यांचा तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे .पिण्याचे आणि शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न, पुनर्विचार करण्याची शासनाकडे मागणी ,शासनाच्या वाळू धोरणाचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेऊन वाळू वाहतुकीचा प्रयत्न

- Advertisement -

Dharangaon Sand Depo ; धणगाव ( साक्षीदार न्युज ) ; – वैयक्तिक स्वार्थासाठी काही मोजक्या लोकांनी भविष्यातील पिढ्यांचे नुकसान करू नये. राजकारणी दबाव आणून लिलाव साध्य करण्याचा प्रयत्न टाळावा व सारासार जनतेचा विचार करावा अशी कळकळीची विनंती नागरिक करताना दिसत आहेत. नांदेड तालुका धरणगाव येथील वाळू च्या घाटाच्या लिलाव बाबत गावकऱ्यांनी तसेच पर्यावरणवादी लोकांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. सदर प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने पार पडलेली नाही तसेच नांदेड येथील नदीच्या पात्रातून या आधीच बेसुमार अवैध उत्खनन झालेले आहे.. आणि परत सदरील ठेका देऊन परत पर्यावरणाचे व त्यामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे मुबलक नुकसान भविष्यात जनतेला भोगावे लागेल, त्या कारणाने सदर लिलाव तात्काळ रद्द करण्यात यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. पिढ्यान् पिढ्यांचा प्रश्न आहे तरी स्वतःच्या फायद्यासाठी नदी बरबाद करण्याऱ्या लोकांना कुठेतरी सामाजिक भान ठेवले पाहिजे अशी कळकळीची विनंती लोक करताना दिसत होते.

Dharangaon Sand Depo
Dharangaon Sand Depo

महत्वाचा मुद्दा म्हणजे फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे नदीमधून ऑर्डर निघताच घाई घाईने कोणतीही नियमांची अंमलबजावणी न होता तात्काळ वाळू उत्खनन सुरू झालेले असून नदी वरून अतोनात प्रमाणात एकच दिवसात वाळू वाहून घेऊन जाऊन धरणगाव येथील डेपो वर मात्र ३ ट्रीप दिसत आहे. Gps प्रणाली सुरू व्हायच्या आतच वाहतूक सुरू झाली.

- Advertisement -

त्यामुळे तात्काळ पुनर्विचार करावा व वाळू ठेका थांबवावा अशी मागणी जोर धरत आहे.
सदर घाटाची पुन्हा विभागीय कार्यालय मार्फत पर्यावरण शास्त्रज्ञ तसेच भूजल शास्त्रज्ञ यांच्याकडून तपासणी अहवाल घ्यावा व त्या नुसार लिलाव विचारात घ्यावा अशी महत्वाची व वाजवी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे. तापी नदीचा नांदेड येथील घाट हा पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील आहे, यावर आता बरेच लोकसंख्येचे पिण्याचे पाणी सुद्धा जवळील पात्रावर अवलंबून आहे. एवढे संवेदनशील प्रकार असताना वाळूचा मनमानी पद्धतीने करण्यात आलेला आहे अशी चर्चा आहे. वाळूचा लिलाव ची ऑर्डर निघण्याच्या आधीच गावातील शेतकऱ्यांच्या शेतातून मनमानी ने जबरदस्ती रस्ते उकरून रस्ते बनवले गेले ज्याचे पंचनामे करण्यात आलेले नाही. वाळू लिलाव बाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून निघालेल्या ऑर्डर प्रमाणे अंमलबजावणी तर दूरच

आधीच धुडगूस घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप गावकरी लोकांनी केलेला आहे. त्यामुळे तात्काळ सदर पूर्ण कार्यपद्धती थांबवून फेर विचार करावा अशी मागणी जोर धरत आहे.अंधारात ठेवून ग्रामपंचायतीने ठराव केल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला. येथील तापी पात्राजवळून नांदेडसह, रोटवट व साळवा येथील पाणीपुरवठा योजना आहेत.

पुढे धावड्याजवळ धरणगाव व साकरे पाणीपुरवठा योजना आहेत. त्यामुळे वाळू उत्खनन झाल्यास आगामी उन्हाळ्याच्या दिवसात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरवेलींची पाण्याची पातळी खालावेल, असे मत ग्रामस्थांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. निविदाधारकांना नदी पात्राचा ताबा देण्या साठी अगदी आतातयीपणा चालू असल्याने ऑर्डर मध्ये लिहिल्याप्रमाणे सर्व अंमलबजावणी व्हावी यासाठी गावकरी मागणी करत होते. या मध्ये याआधी ज्या अधिकारी वर्गावर आधीच याच तापी नदी पात्रा मधून अवैध वाळू वाहण्यासाठी समन्वय केला असा आरोप होता तेच अधिकारी परत वाळू लिलावात ठेकेदार लोकं सोबत समन्वय साधून मनमानी करताना आढलून आल्याने सदर ठेका थांबवावा अशी विनंती, धरणगाव युवा सेना उपतालुका अध्यक्ष भरत सैदाणे, ठाकरे सेनेचे गिरीश चौधरी तसेच प्रचंड प्रमाणात गावकरी उपलब्ध होते असे सर्वांनी केली आहे.

Dharangaon Sand Depo

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS