Vasundhara Day साक्षीदार न्युज । उमरगा । वसुंधरा दिनानिमित्त सन 1995 भारत विद्यालय उमरगा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून साजरा केला.
येत्या काळात समूहातील प्रत्येक सदस्यांच्या नावाचे किमान एक तरी झाड उमरगा शहरात लावण्याचा मानस समूहाच्या वतीने वसुंधरा दिनानिमित्त घेण्यात आला. सध्या कडक उन्हाळा असून आपल्या शहराचे तापमान 40 अंशाच्या पुढे जात असून याला मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणे गरजेचे झाले आहे. 1995 समूहाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. कोरोनाच्या काळात शहरातील ईदगाह कोविड सेंटर ला एक महिन्याचे रात्रीच्या जेवणाची व्यवस्था समूहाच्या वतीने करण्यात आली होती. सध्या प्राथमिक स्वरूपात वृक्षारोपणाची सुरुवात केली असून येत्या काळात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणार असल्याची माहिती खाजा मुजावर , शफी चौधरी , सुनील सगर यांनी दिली.
पहलगाम हल्ल्याचा राज ठाकरेंचा निषेध: केंद्राने कठोर कारवाई करावी, मनसे सरकारसोबत
धरणगावात बदला प्रकरणात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, संशयित स्वतः पोलीस ठाण्यात हजर
स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय; नयनतारा मॉलवर पोलिसांचा छापा, ४ महिलांची सुटका