साक्षीदार | १७ नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरातील नवीन बसस्थानक आवारात एका तरुणाने महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी इतर प्रवाशांनी संशयित तरुणाला पकडून चांगलाच चोप दिल्याची घटना गुरुवारी दुपारी १२:३० वाजता घडली. त्यानंतर त्या तरुणाला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत एक संशयित तरुण हा महिलांच्या अंगाला स्पर्श करत असल्याचे दिसून आले. हा प्रकार प्रवाशांनी एसटी कर्मचारी व सुरक्षा अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला. त्यानुसार यावेळी काही प्रवाशांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या युवकास पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिस कर्मचाऱ्यांनी बसस्थानक आवारात येऊन संशयित तरुणाला ताब्यात घेतले. यावेळी प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली होती.