back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

या राशींना मंगळवार जाणार महत्वपूर्ण ; वाचा राशिभविष्य !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | १० ऑक्टोबर २०२३ | मेष : अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा. गुंतागुंतीच्या व्यस्त दिनचर्येत आज वेळ काढता येणार नाही. आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकतात.

- Advertisement -

 

वृषभ : आर्थिक लाभची शक्यता. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या लोकांशी बोलताना तुम्हाला तुमचे मुद्दे मांडण्यात खूप अडचणी येतील. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी काळ अतिशय योग्य. एकांतात वेळ घालवाल. वैवाहिक आयुष्यात आनंददायी दिवस.

- Advertisement -

 

मिथुन : मालमत्ताविषयक कामे होतील आणि नफा होईल. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. कुटुंबियांना पर्याप्त वेळ देणे गरजेचे. आजच्या एखाद्या कठीण परिस्थितीत जोडीदार कदाचित तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही.

 

कर्क : आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. आपल्या जोडीदाराने दिलेले वचन पाळले नाही म्हणून त्यावर उखडू नका. दिवसाची सुरवात जरी थोडी थकणारी राहील. परंतु, तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील.

सिंह : आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. सकारात्मक निकाल मिळण्यासाठी तुम्ही पालकांच्या दृष्टिकोनातून पाहा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. रिकाम्या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे. जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होईल.

 

कन्या : अत्यंत व्यस्त दिवस. आर्थिक नुकसान संभवते. नातेवाईकांना भेटून त्यांच्यासमवेत वेळ घालविल्याने तुमचा फायदा होऊ शकेल. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल.

 

तूळ : आर्थिक लाभ होतील. ग्रहतारे आज तुम्हाला अतिरिक्त ताकद प्राप्त करून देतील. म्हणून महत्त्वाचे निर्णय आजच घ्या. आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल. जोडीदारांसोबत अविस्मरणीय क्षण घालवाल.

 

वृश्चिक : गुंतवणूक करताना विचार करा. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल.

धनु : आर्थिक लाभ होतील. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. चांगल्या कृतीमुळे, कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील. तुमच्या जोडीदाराच्या एखाद्या कामामुळे तुम्ही अवघडले जाल.

 

मकर : आर्थिक खर्च होतील. कुटुंबाच्या गरजा समजून घ्या. नोकरवर्ग, सहकारी आणि सहयोगी कर्मचाऱ्यांबरोबरचे प्रश्न सुटणार नाहीत. तुम्ही रिकाम्या वेळेत आपल्या आवडीचे काम करणे पसंत कराल. पाहुण्यांमुळे तुमचा प्लॅन विस्कळीत होऊ शकतो.

 

कुंभ : धन लाभ होण्याची शक्यता. घरगुती कामं बराच काळ व्यस्त ठेवतील. रखडलेल्या प्रकल्पाचे काम आज पूर्ण झाल्याने समाधान लाभेल. आवडीचे काम करणे पसंत कराल. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल.

 

मीन : अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील. मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करा. तुमच्या कुटुंबाकडून तुमचे कौतुक होईल. तुमच्याकडे महत्त्वाच्या अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. कंपनीत तुमचे पद महत्त्वाचे ठरेल.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

CM Rekha Gupta Attacked | भाजपच्या मुख्यमंत्र्याच्या जनता दरबारात...

CM Rekha Gupta Attacked साक्षीदार न्यूज । आज, २० ऑगस्ट २०२५ रोजी जनता दरबारात एका ३५ वर्षीय तरुणाने हल्ला केला, ज्यामुळे राजधानीत खळबळ उडाली...

RECENT NEWS