साक्षीदार | ५ नोव्हेबर २०२३ | नेहमीच सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडीओ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा व्हायरल झाला आहे. नागपुरातील एका विवाह सोहळ्यानिमित्त हे दोन नेते एकत्र आले होते.
या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पा या चित्रपटामधील श्रीवल्ली हे गाणं गायलं आहे. तर नितीन गडकरी यांनी या कार्यक्रम “तुझसे नाराज नहीं” हे गाणं गायलं आहे. श्रीवल्ली गाण्याचा गायक जावेद अली याच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यासोबत गाणं गाताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पा चित्रपटातील गाणे गायले. यावेळी उपस्थितांनी उपमुख्यमंत्र्याना चांगलीच दाद दिली. तर देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर नितीन गडकरी यांची गाणे म्हणण्याची वेळी आली. मग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी गाणे गायले. नितीन गडकरी यांची आवड जुने गाणे गायले आहे. 1983 मध्ये आलेले मान्सून या चित्रपटातील “तुझसे नाराज नही जिंदगी” हे गीत गात नितीन गडकरी आणि कांचन गडकरी यांना उपस्थितांची दाद मिळाली.