Tuljapur Drug Case | धक्कदायक : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात तुळजाभवानी मंदिराच्या 13 पुजाऱ्यांची नावे समोर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tuljapur Drug Case  साक्षीदार न्युज । धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी (Drugs Case) प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या प्रकरणात तुळजाभवानी मंदिरातील 13 पुजाऱ्यांची नावे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या पुजाऱ्यांचा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशीही संबंध असल्याची माहिती उघड झाली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजा यांनी पोलिसांकडून आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

- Advertisement -

दरम्यान, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांनी या प्रकरणात सर्व पुजाऱ्यांची बदनामी होऊ नये, अशी विनंती केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पुजाऱ्यांचा मंदिरातील दैनंदिन पूजा कार्याशी कोणताही संबंध नाही. तसेच, गेल्या तीन वर्षांपासून तुळजापूरमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करीविरोधात पुजारी मंडळाने सर्वप्रथम आवाज उठवला होता, असा दावाही त्यांनी केला आहे.

या प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपींची नावे समोर आली असून, त्यापैकी 21 आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांसमोर या फरार आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान आहे. (Tuljapur Drug Case) तुळजापूर हे पुजाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते, त्यामुळे सर्व पुजाऱ्यांवर संशय घेऊ नये, असे आवाहन विपीन शिंदे यांनी केले आहे. या प्रकरणाने आता धार्मिक आणि राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपही तीव्र झाले आहेत. तुळजापूर उबाठा गटाचे कार्यकर्ते राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे हे ड्रग्ज तस्करीत सामील असल्याचे उघड झाले आहे. भाजप कार्यकर्त्यांनी खासदार निंबाळकर यांच्यावर निशाणा साधत त्यांचे फोटो व्हायरल केले आहेत. दुसरीकडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ड्रग्ज प्रकरणातील काही आरोपी हे राणा पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Tuljapur Drug Case

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Molecular Lab Jalgaon | धक्कादायक: जळगाव जिल्हा रुग्णालयातील ‘माॅलेक्युलर...

Molecular Lab Jalgaon देयके पूर्ण; तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांसह बड्या अधिकाऱ्यांवर संगनमताने भ्रष्टाचाराचा आरोप Molecular Lab Jalgaon साक्षीदार न्युज  | सुनिल भोळे | जळगाव जिल्हा सामान्य...

LPG Price | एलपीजी दरवाढीने रिक्षाचालक आक्रमक! ८ एप्रिलला...

LPG Price | जळगाव | एलपीजी इंधनाच्या वाढत्या दरांमुळे आणि अपुऱ्या पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या ऑटोरिक्षा चालकांनी ८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलनाचा इशारा...

Mahatma Phule Jayanti | साकळीत फुलेंच्या विचारांचा महाजागर! ११...

Mahatma Phule Jayanti साकळी | मिलिंद जंजाळे | क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त साकळी येथे विचारप्रबोधनाचा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि. ११...

RECENT NEWS