फोन पे वर चुकून आलेले विस हजार रुपये प्रामाणिकपणे केले परत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

ऑटोरिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाबद्दल पी आय अश्विनी भोसलेंनी सत्कार करून दिले रोख बक्षीस

- Advertisement -

ऑटोरिक्षा चालकाणे घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन

उमरगा । साक्षीदार न्युज । मोबाईलवरील ‘फोन पे’वरून नजरचुकीने उमरगा शहरातील एका ऑटोरिक्षा चालकाच्या बँक खात्यावर जमा झालेले 20 हजार रुपये,ज्याचे होते त्यास परत केल्याने जिल्हाभरातुन कौतुक होत आहे. नितीन वाकळे असं या रिक्षाचालकाचं नाव असून आर्थिक परिस्थितीने अत्यंत गरीब असलेल्या या युवकाणे पैसे परत करून आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडविल्याने पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी या रिक्षा चालकाचा सत्कार करून मनोबल वाढवत रोख एक हजार रुपये बक्षीस दिले.

- Advertisement -

मोबाईलवरील डिजिटल पेयमेन्ट ऍप्स द्वारे पैसे देण्या-घेण्याचे केले जाणारे ऑनलाइन व्यवहार जेवढे सोयीचे आहेत, तेवढेच ते धोकादायक देखील आहेत.घाईगडबडीत एखादा नंबर चुकला की रक्कम दुसऱ्याच अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर जमा होते याचा प्रत्यय अनेकांना आलेला आहे. असाच काही प्रकार उमरगा शहरातील ऑटोरिक्षा चालक नितीन वाकळे यांना अनुभवास आला.दररोज दोन-तीनशे रुपये प्रामाणिकपणे कमाई करून उपजीविका भागवणारा नितीनच्या मोबाईल वर दि 25 फेब्रुवारी रोजी पैसे जमा झाल्याचा मॅसेज आला. रक्कम पाहून तो थक्क झाला. तब्बल 20 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले होते. त्यातले तो एक रुपया ही खर्च न करता आपल्या जवळच्या मित्रांना याबाबत कल्पना दिली.मित्र उमेश आबाचने यांनी त्यास पैसे खर्च करू नको,तुझी उधारी कितीही असली तरी यातला रुपाया कुणाला देऊ नको असा सल्ला दिला.25-26-27 तीन दिवस उलटले पण कोणाचाही फोन आला नाही. अखेर 28 फेब्रुवारी रोजी पुण्याहून एका व्यक्तीचा फोन आला आणि त्याने चुकून पैसे पाठवले असल्याचे सांगीतले. त्यावर मित्र श्री आबाचाने यांनी शहानिशा केली तेंव्हा प्रविण गुलाब सोनवणे नामक व्यक्ती हा मूळ कवठा तालुका उमरगा येथील व्यक्ती जो हल्ली पुणे शहरात जॉब करतोय त्यांनी त्यांच्या बंधू नितीन यांच्या खात्यावर लग्न समारंभ निमित्ताने पैसे पाठवत असताना घाई गडबडीत नितीन वाकळे यांच्या खात्यावर पैसे पाठवले असे निदर्शनास आले,तेंव्हा याबाबत उमरगा पोलिसांना सविस्तर माहिती कळवून आलेले सर्व पैसे सोनवणे यांना त्याच मोबाईल नंबर वर फोन पे द्वारे परत करण्यात आले.

नितीन च्या या प्रामाणिकपणा बद्दल पो. नि.अश्विनी भोसले,सहाय्यक पोलीस निरीक्षक भराटे,क्रीडा शिक्षक संजय कोथळीकर, व्यवसायिक उमेश आबाचाने आणि अर्बन बँकेचे संचालक बालाजी सूर्यवंशी यांनी उमरगा पोलीस ठाण्यात एक मार्च रोजी सायंकाळी यतोच्छीत सत्कार केला. यावेळी पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी स्वतःच्या पर्समधून रोख एक हजार रुपये काढून या आर्थिक गरीब रिक्षा चालकाला बक्षीस स्वरूपात भेट दिले. उमरगा शहरातील पतंगे रोड कॉर्नरवर बूट पॉलीश करून मुलांचा सांभाळ करनारे कै. शिवाजी वाकळे यांचा हा नितीन मुलगा असून,शहरात पाण्याचे जार आपल्या डोक्यावर घेऊन होम डिलिव्हरी करायचा.आता तो जुना आटोरिक्षा चालवून प्रामाणिकपणे आपल्या कुटुंबाचा उदरनिवाह भागवतोय.. नितीन वाकळेच्या या प्रामाणिकपणा बाबत सर्वत्र कौतुक होतोय..

 

आर्थिक बिकट तथा गरीब परिस्थितीत जन्म घेणे हा महापाप आहे का.? असा मला प्रश्न नेहमीच पडतो,पण आमच्यातील कष्ट करण्याची जिद्द, प्रामाणिकपणा याबद्दल आतापर्यंत कोणीच कौतुक केलं नाही, आज पहिल्यांदा माझ्या प्रामाणिकपणाचं कौतुक पोलीस अधिकारी अश्विनी भोसले मॅडम केले. माझ्या जिवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतय.

नितीन वाकळे, ऑटो रिक्षा चालक

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS