ड्रग्ज प्रकरणातील ललितसह दोन आरोपी १४ दिवस पोलीस कोठडीत !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २ नोव्हेबर २०२३ | राज्यात गेल्या महिन्यात ललित पाटील प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत असतांना आता यात मोठी अपडेट समोर आली आहे. ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचा सखोल तपास आवश्यक आहे. हा देशातील तरुणाई नासवण्याचा प्रकार आहे. या गुन्ह्यांच्या मुळाशी जायचे आहे, असे सांगून तपास अधिकारी व गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील तांबे यांनी ललितसह दोन्ही आरोपींना चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी चौदा दिवसांची कोठडी न देता ७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

- Advertisement -

ड्रगतस्कर ललित पाटील याने साकीनाका पोलिसांच्या ताब्यात असताना अंधेरी न्यायालयात आपल्या जीविताला धोका असल्याचा दावा केला आहे. यावेळीही ललितचे वकील संदीप बाली यांनी आरोग्य आणि सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित करीत त्याच्या जिवाला धोका असल्याचा पुनरुच्चार केला. त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ललितला कुणापासून धोका आहे, असे विचारले असता बाली यांनी ‘संबंधित ॲथॉरिटी’ असा शब्दप्रयोग केला. त्यावर न्यायालयाने ललित पुण्यात सुखरूप पोहोचला आहे ना, अशी टिपणी केली.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS