Robbing ; वृद्धाला लुटल्या प्रकरणी दोन अटकेत !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १६ ऑक्टोबर २०२३ | रिक्षातून प्रवास करणाऱ्या वृद्धाकडील रोकड लांबविणाऱ्या ईस्माईल शेख शब्बीर (वय ४८, रा. मास्टर कॉलनी) सैय्यद आरीफ सैय्यद सईद (वय ३९, रा. पिंप्राळा हुडको) या दोघ चोरट्यांना शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्यांच्या मुसक्या आवळल्या.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील लाहसर येथे राहणारे राजाराम तुळशीराम पाटील (वय ८८ ) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी ते कामाच्या निमित्ताने जामनेर शहरात आले होते. दुपारी ४ वाजेच्या सुमारास जामनेर पोलीस स्टेशन जामनेर बसस्थानक दरम्यान रिक्षातून प्रवास करत असतांना रिक्षातील काही चोरटयांनी त्यांच्याजवळील ५४ हजारांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्हा उघडकीस आणला असून दोन संशयित आरोपी हे जळगावातील असलेल्याचे समोर आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने शनिवारी सापळा रचून ईस्माईल शेख शब्बीर याला मास्टर कॉलनीतून तर सैय्यद आरीफ सैय्यद सईद याला पिंप्राळा हुडको परिसरातून अटक केली. त्या दोघांनी आपणच चोरी केल्या कबुली दिली. पुढील कारवाईसाठी दोघांना जामनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोहेकॉ अकरम शेख, पोहेकॉ सुधाकर आंभोरे, महेश महाजन, किरण चौधरी, पो.ना. विजय पाटील, पो.कॉ. सचिन महाजन यांच्या पथकाने केली आहे.

Robbing

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS