दर्शन कॉलनी व निमखेडी रस्त्यावर घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

दर्शन कॉलनी व निमखेडी रस्त्यावर घरफोडी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना जळगाव तालुका पोलिसांनी सोमवारी २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जळगाव शहरातील दाणा बाजार परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जिमाउल्ला खान अलहउल्ला खान (वय- ६०) व सैय्यद अफसर सैय्यद अजगर (वय- २२) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

- Advertisement -

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हायवे दर्शन कॉलनी व निमखेडी रस्त्यावर घरफोडीच्या दोन घटना झाल्या होत्या. यातील चोरट्यांचा शोध सुरू असताना जिमाउल्ला खान अलहउल्ला खान व सैय्यद अफसर सैय्यद अजगर यांनी ही चोरी केल्याची माहिती व हे दोघे जण शहरात आल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांना मिळाली. त्यांनी सपोनि अनंत अहिरे, पोहेकॉ नरेंद्र पाटील, प्रवीण कोळी, अभिषेक पाटील व इतर कर्मचाऱ्यांना दोघांना ताब्यात घेण्याविषयी सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने सोमवारी २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता संशयित आरोपी जिमाउल्ला खान अलाहउल्ला खान आणि सय्यद अफसर सय्यद अजगर यांना दाणा बाजार परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS