साक्षीदार | १५ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील एका परिसरात काहीही कारण नसतांना तरूणासह त्याच्या भावाला बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनीवार १४ ऑक्टोबर रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कानळदा रोड परिसरातील के.सी.पार्क येथे विजय नारायण इंगळे (वय ३४) हे आपल्या परिवारसह रहिवासास असून ते खासगी काम करून आपला उदरनिर्वाह करतात. दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्याच परिसरात राहणारे अशोक ठोसर आणि त्यांचा मुलगा व मुलगी याच्यासह १० ते १२ जणांनी काहीही कारण नसतांना विजय इंगळे व त्याचा भाऊ यांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर विजय इंगळे यांनी शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अशोक ठोसर, त्याचा मुलगा आणि मुलगी तसेच अनोखळी १० ते १२ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम वाघळे करीत आहे.