जळगावातील सराईत दोन गुन्हेगार दोन वर्षासाठी हद्दपार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ८ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरात टोळीने १५ गंभीर गुन्हे करणाऱ्या जुबेर उर्फ डबल भेजा भिकन शेख (२२) व आमीर उर्फ गुड्डन शेख महंमद (२०) (दोघे रा. गेंदालाल मिल) या दोन्ही रेकॉर्डवरील गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तसे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणाऱ्या जुबेर उर्फ डबल आणि आमीर उर्फ गुड्न यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडेदोन्ही सराईत गुन्हेगारांच्या हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाची उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी चौकशी केल्यानंतर दोन्ही संशयितांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार युनूस शेख, पोहेकॉ सुनील दामोदरे, बशीर तडवी, विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, पोकों अमोल ठाकूर, पोलिस नाईक प्रफुल्ल धांडे यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS