साक्षीदार | १३ नोव्हेबर २०२३ | जळगाव तालुक्यातील भोकर या गावी मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून अलोक भास्कर कोळी (२१) व त्याचा मित्र दीपक याला चार जणांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना शुक्रवार, १० नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी शनिवार, ११ नोव्हेंबर रोजी रात्री तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, १० नोव्हेंबर रोजी दुपारी अलोक कोळी हा त्याचा मित्र दीपकसोबत घराच्या ओट्यावर बसला होता. त्यावेळी अलोकने गावातील एकाला दीपकला केलेल्या मारहाणीचा जाब विचारला. याचा राग आल्याने गावातील चार जणांनी दोघांना लाठ्याकाठ्या आणि लोखंडी सळईने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.