आसोदा बसस्थानकाजवळ उसनवारीने दिलेल्या पैशांवरून दोन गटात तुफान हाणामारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ; – तालुक्यातील आसोदा येथील बसस्थानकाजवळ एका तरूणाला उसनवार दिलेल्या पैशावरून दोन गटात तुफान हाणामारी करत चाकूहल्ला केल्याने एक तरूण जखमी झाल्याची घटना बुधवारी १७ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी १८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक असे की, खाद्य पदार्थ व्यावसायिक अजय तुकाराम पाटील (वय- २३, रा. आसोदा, ता. जळगाव) यांनी गावातील तरुणाला ५० हजार रुपये दिले होते. बुधवारी १७ जानेवारी रोजी उसनवारीचे पैसे घेण्याच्या कारणावरून गावात राहणारे योगेश दिगंबर कोल्हे, मयुर कोळी, दिपक धनराज सपकाळे, कल्पेन निलेश इंगळे आणि मोहित सपकाळे रा. आसोदा ता.जि.जळगाव यांनी बेदम मारहाण केली तर यातील एकाने धारदार चाकूने वार करून गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेल्या अजय पाटील याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर गुरूवारी १८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार योगेश दिगंबर कोल्हे, मयुर कोळी, दिपक धनराज सपकाळे, कल्पेन निलेश इंगळे आणि मोहित सपकाळे रा. आसोदा ता.जि.जळगाव या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर दुसऱ्या फिर्यादीत मयुर सपकाळे याने दिलेल्या फिर्यादीवरून अजय तुकाराम पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माणिक सपकाळे आणि पोहेकॉ सुधाकर शिंदे हे करीत आहे.

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS