साक्षीदार | १ नोव्हेबर २०२३ | जळगाव जिल्ह्यातील महामार्गावर नियमित अपघाताची मालिका सुरु असतांना नुक्तेतच भुसावळ तालुक्यातील राष्ट्रीय महामागावरील पुलाजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील आनंद नगरात उमाकांत मुरलीधर परदेशी (वय-३९) हे हातमजूरीचे करून आपला उदरनिर्वाह करतो. दि. २५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास उमाकांत परदेशी हा आपला मित्र भुषण राजेंद्र बिऱ्हाडे यांच्या सोबत दुचाकीने भुसावळ तालुक्यातील फुलगावजवळील राष्ट्रीय महामार्गाने भुसावळला येणासाठी दुचाकीने येत होते. त्यावेळी महामार्गावरील पुलाजवळ समोरून भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक (एमएच १४ बीसी ४९६०) ने दोघांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. दोघांना स्थानिक नागरीकांच्या मदतीने तातडीने भुसावळ शहरातील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. उपचार घेतल्यानंतर मंगळवारी ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता उमाकांत परदेशी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार कारवरील चालक रितेश प्रमोद कोल्हे रा. दिपनगर, भुसावळ याच्याविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोहर पाटील करीत आहे.