दोन महिन्यापासून फरार आरोपीला ठोकल्या बेड्या !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १८ ऑक्टोबर २०२३| दोन महिन्यांपासून फरार असलेल्या दुचाकी चोरीतील संशयित आकाश संजय नागपुरे ( वय १९, रा. शिरसोली ता. जळगाव) याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील जळके पाटील गल्लीतील विठ्ठल मंदिराजवळ राहणारे किरण हिलाल चिमणकारे यांच्या मालकीची दुचाकी दि. २४ जून रोजी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही दुचाकी शिरसोली येथील आकाश नागपुरे याने चोरल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोहेकॉ गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, पोना विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी यांचे पथक तयार करीत कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने मंगळवारी सकाळच्या सुमारास आकाशच्या गावातूनच मुसक्या आवळल्या. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे हे करीत आहे

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS