जळगाव ; – देशासह राज्यात अनेक भागात कोरोनाच्या JN1 या सब व्हेरियंटमुळे खळबळ उडाली असून महाराष्ट्रात या व्हेरियंटचे अनेक रुग्ण आढळून घटना समोर येत आहे . महत्वाचे म्हणजे जळगाव जिल्ह्यातही JN1 चा पहिला रुग्ण हा २५ डिसेंबर रोजी एक ४३ वर्षीय रुग्ण आढळून आला होता .सदरचा रुग्ण भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे प्रशासनाकडून कळविण्यात आले होते, आता पुन्हा आणखी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
मागील कोरोना काळात जळगाव जिल्ह्यातील चोपडा हे हॉटस्पॉट ठरले होते आणि आताचे हे दोन्ही कोरोना बाधित दोन रुग्ण शनिवारी आढळून आले आहे . दोन्ही कोरोना बाधित रुग्ण असून त्या साधारण ३५ ते ३७ वयोगटातील असल्याची माहिती मिळालाय आहे . या दोघा रुग्णांवर चोपड़ा उपजिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात (आयसोलेशन) उपचार सुरू आहेत. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहे.चोपडा येथे आढळून आलेल्या दोनही रुग्णांचे नमुने घेऊन जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.नवीन व्हायरसचा एकही रुग्ण अद्याप आढळला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
देशासह राज्यात कोरोनाने पुन्हा डोकेदुखी वाढवली असून पुन्हा एकदा राज्यातील आरोग्य यंत्रणेला अलर्ट राहण्याच्या सूचना देखील करण्यात आहेत .यावेळी कोरोनाचा JN1 जेएन–वन हा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. दिवसेंदिवस या व्हेरीएंटचे रुग्ण वाढतांना दिसत असल्याने आरोग्य यंत्रनेचे टेन्शन वाढवलं आहे .
नागरिकांनो घाबरू नका… काळजी घ्या…
कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा सब व्हेरिएंट आहे.सध्या तरी जळगाव जिल्ह्यात या नव्या JN1 जेएन–वन नवीन व्हेरिएंटचा एकही रुग्ण नाही. या व्हेरिएंटमुळे भीती बाळगण्याची गरज नाही.परंतु काळजी घेण्याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
जेएन.१ इतर कोरोना प्रकारांपेक्षा जास्त संसर्गजन्य किंवा गंभीर आहे का?
JN.1 BA.2.86 शी संबंधित आहे जो Omicron चा वंशज आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली होती. तज्ञांच्या मते, दोन्ही रूपे जवळजवळ समान आहेत. त्यांच्या स्पाइक प्रथिनांमध्ये फारच थोडा फरक आहे. स्पाइक प्रोटीन हा विषाणूचा भाग आहे ज्यामुळे तो मानवी पेशींवर हल्ला करू शकतो. नवीन प्रकार रोगप्रतिकारक शक्तीला चकित करण्यासाठी अधिक प्रभावी आहे. म्हणजे संसर्ग होण्याची शक्यताही वाढते.कोरोना JN.1 च्या नवीन प्रकाराच्या लक्षणांमध्ये या गोष्टींचा समावेश आहे: ताप थकवा वाहती सर्दी घसा खवखवणे डोकेदुखी खोकला गर्दी काही प्रकरणांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या
खबरदारीचे उपाय खालीलप्रमाणे
देशात कोविड-19 प्रकरणांमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीदरम्यान, डॉक्टरांनी लोकांना मास्क घालण्याचा, गर्दी टाळण्याचा आणि सकस आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. JN.1 प्रकाराबाबतही अशीच सावधगिरीची पावले उचलावी लागतील.
साबण आणि पाण्याने किमान 20 सेकंद हात धुवा साबण आणि पाणी उपलब्ध नसल्यास, कमीतकमी 60 टक्के अल्कोहोलसह हँड सॅनिटायझर वापरा. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे मास्कने नाक आणि तोंड व्यवस्थित झाकणे दोन व्यक्तिमधील अंतर ठेवा.