Maharashtra Chief Minister ; दिल्लीच्या बैठकीत शिंदेंना दोन ऑफर ; उपमुख्यमंत्री व्हा नाहीतर…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Maharashtra Chief Minister ; महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार यावर जोरदार चर्चा दिल्लीत सुरु आहे . देशाचे गृहमंत्री अमित शाहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी गुरुवारी रात्री दिल्लीमध्ये भेट घेतली आहे . भाजपाला राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील तिढा अध्याप देखील सुटलेला नाही आणि हा तिडा सोडविण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी गुरुवारी रात्री भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची या तिघांनीं भेट घेतली. या भेटीमध्ये शिंदें आणि अजित पवार या दोघांना सत्तेत आपल्याला कसा वाटा अपेक्षित आहे याबद्दलची भूमिका या नेत्यांसमोर मांडली आहे .

- Advertisement -

राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनात पार्टीने आपल्या दोघेही मित्र पक्षांना सत्तेत वाटेकरी म्हणौन आपण काय देऊ शकतो या बद्दल माहिती ज्ञात आली आहे . या बैठकीमध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजपाकडून दोन ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच या बैठकीमध्ये भाजपाकडून काही मुद्दे अगदी स्पष्टच सांगण्यात आले आहे .

अजित पवार आणि शिंदेंनी मांडली आपली भूमिका
महायुतीमधील घटक पक्षांचे महत्त्वाचे मानले जाणारे नेते आणि अमित शाह, नड्डा यांची जवळपास दिसा तास बैठक पार पडली . या झालेल्या बैठकीमध्ये भाजपाने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना यांनी स्पष्टच सांगितले आहे कि , मुख्यमंत्री हा भाजपाचाच असणार आहे . या बैठकीत दोन्ही मित्रपक्ष एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मंत्रिमंडळासंदर्भात आपले प्रस्ताव देखील केंद्रीय नेत्यांसमोर ठेवलेले आहेत . तर दुसरीकडे सर्वात मोठा पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भाजपाने दोन ऑफर दिल्या आहेत अशी माहिती देखील समोर येत आहे.

- Advertisement -

काय मागण्या केल्या शिंदेंनी ?
महाराष्ट्राचे काळजीवाहू माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर आपला पक्षाची म्हणजेच शिवसेनेची भूमिका मांडताना त्यांनी सांगितले कि , आम्हाला 12 मंत्रिपदांची अपेक्षा आहे . विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील एकनाथ शिंदे यांच्याकडून मागणी करण्यात आली. गृहमंत्रिपदासोबतच नगरविकास आणि इतर महत्वाची खाती शिंदेंनी मागितली आहे . तसेच पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखला जावा अशी विनंती शिंदेंनी अमित शाहांकडे केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे .

या दोन ऑफर भाजपाकडून शिंदेंना दिल्या
अमित शहा यांनी एकनाथ शिंदें यांचे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर भाजपाकडून शिंदेंना त्यांच्यासाठी दोन ऑफर दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर देताना पहिला पर्याय उपमुख्यमंत्री होण्याचा देण्यात आला आहे. तर दुसरा पर्याय हा केंद्रामध्ये मोठं कॅबिनेट पद घ्या अशी ऑफर भाजपाकडून देताना सांगण्यात आलेल आहे.

शिंदेनी सांगितले कि , ‘सकारात्मक बैठक’
या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी महायुतीत आम्ही भाजपासोबत असल्याचं शिंदेनी अमित शहांना आवर्जून सांगितलं. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बैठक सकारात्मक झाली आहे अशी माहिती शिंदेंनी दिली. महायुतीची मुंबईमध्ये अजून एक बैठक होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे .

Maharashtra Chief Minister

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

RECENT NEWS