साक्षीदार | २२ नोव्हेबर २०२३ | भुसावळ येथून कंपनीतील काम आटोपून येत असताना तालुक्यातील सार्वे गावाजवळ कार दुभाजकावर आदळल्याने गुजरात राज्यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.२० रोजी भुसावळ येथे कंपनीच्या कामानिमित्त चालक अजय नरेंद्र कोकजे (६२, बडोदा), चेतन ताखासिंग राज (२७, भानपुरा, ता. अकलाव, जि. आनंद), तखासिंग उदयसिंग राज (६०, भानपुरा, ता. अकलाव) हे आपल्या गाडीतून (जीजे२३/सीई३६११) ने आले होते. कंपनीचे काम संपवून दि. २१च्या पहाटे निघाले असता सार्वे गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. त्यांच्या ताब्यातील आर्टिका कार ही भरधाव वेगाने चालवत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने दुभाजकावर जोरदार आदळली. यात चालक अजय नरेंद्र कोकजे व चेतन ताखासिंग राज यांचा जागीच मृत्यू झाला.