महिलेचे बंद घर फोडून मुद्देमाल लांबविणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ; – समता नगरात राहणाऱ्या महिलेच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटातील ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबवणाऱ्या प्रकाश श्रावण सुरवाडे (वय-१८) व दीपक सुभाष भांडारकर (वय-२१) दोन्ही रा. समतानगर दोन संशयित आरोपींना रविवारी ७ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजता समता नगरातून रामानंद नगर पोलिसांनी अटक केली.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, समता नगरमधील रहिवासी प्रतिभा चंद्रकांत बनसोडे (वय-४०) या शनिवारी ६ जानेवारी रोजी कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले रोख ७१ हजार रुपये व १० हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पट्ट्या असा एकूण ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. प्रतिभा बनसोडे या घरी आल्या, त्यावेळी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चोरी करणाऱ्या दोन्ही संशयितांना समता नगरातून अटक केली आहे.

Woman House

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS