back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

अवैद्य वाळुची वाहतुक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यावल ( प्रतिनिधी ) ; – येथील तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली महसुलच्या गस्तीवर असलेल्या फिरते पथकाच्या कार्यवाहीत विनापरवाना अवैधरित्या गौणखनिज ची वाहतुक करणारे दोन टूॅक्टर जप्त करण्यात आले असुन,प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे .

- Advertisement -

यावर करा क्लिक

पालक मंत्री गुलाब भाऊ यांच्या आवाजातील सुरेल गाणे एका

या संदर्भात महसुल प्रशासनाच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बामणोदच्या मंडळ अधिकारी बबीता चौधरी , यावलचे तलाठी ईश्वर कोळी , साकळीचे तलाठी मिलींद कुरकुरे यांच्यासह तहसीलदारांचे वाहनचालक अरविंद बोरसे यांचे पथक दिनांक २ जानेवारी मंगळवार रोजी सकाळच्या सुमारास गस्तीवर असतांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्यांच्या पथकाने यावल शिवारातील साठवण तलाव परिसरातुन विनापरवाना विना क्रमांकाच्या दोन ट्रॅक्टर व्दारे वाळु ची अवैद्य वाहतुक करतांना आढळुन आलीत तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व त्यांच्या पथकाने ही दोघ ट्रॅक्टर जप्त करून ताब्यात घेतली असुन, वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहे .

- Advertisement -

दरम्यान दोघ ट्रॅक्टर वाहनांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती मिळाली असुन ,महसुल प्रशासनाच्या वतीने होत असलेल्या अवैद्य गौणखनिज विराधातील कारवाईत सातत्य नसल्याने ठरावीक वेळेत काही ठरावीक लोकांवरच अशा प्रकारच्या दंडात्मक कारवाई प्रशासन करीत असल्याचे बोलले जात असुन महसुल प्रशासनाचे वचक व भिती अवैद्यरित्या वाळूची वाहतुक करणाऱ्या वाळु माफियावर राहीलेली नसल्याचे दिसुन येत आहे .

Two tractors sand seized

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS