साक्षीदार | २५ नोव्हेबर २०२३ | अनेक जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच दाेन माल वाहतुक वाहनांच्या झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना परभणी जिल्ह्यातील ताडकळस येथील पिंगळघड नाल्यावर घडली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे काल रात्री नऊच्या सुमारास पूर्णा येथून ताडकळसकडे येणारे एक माल वाहतुकीचे वाहन आणि ताडकळसहून पूर्णाला जाणाऱ्या दुस-या माल वाहतुकीच्या वाहनाची समोरासमोर टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण हाेती की दाेन्ही गाड्यांचे माेठे नुकसान झाले. या घटनेत एका माल वाहतुकीच्या गाडीचे चालक विजय रावसाहेब मुस्तापुरे (वय 48, राहणार कोनेरवाडी तालुका पालम) यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या घटनेतील जखमींना परभणी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. ताडकळस पोलीस पुढील तपास करत आहेत.








