महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात : दोन तरुण ठार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ३ नोव्हेबर २०२३ | भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे जाणाऱ्या जुन्या महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या दुचाकींची समोरासमोर जबर धडकून झालेल्या अपघातात वरणगाव व फुलगावातील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव येथील महामार्गावरील शिवाजी नगर येथे बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकल स्वारांनी एकमेकांना धडक दिली. यात दोन्ही जण गंभीर जखमी झाले. या जखमींना वरणगावच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या भीषण अपघातात फुलगाव येथील माजी सैनिक कॉलनीतील विजय रामकृष्ण महाजन (वय ४७) आणि वरणगाव येथील गणपती नगरमधील आदर्श शाळेजवळ राहणारे ललित धांडे (वय ३५) या दोघांना आपले प्राण गमवावे लागले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होतांनाच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. फुलगाव ते वरणगाव या मार्गावर लहान-मोठे अपघात होत असल्याने येथे सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कधीपासून होत असली तरी याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. दरम्यान, दोन्ही मृतांच्या पार्थिवाचे गुरुवारी सकाळी १० वाजता वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. गिरीष उगले यांनी शवविच्छेदन केले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS