Chalisgaon murder ; दुचाकी धारकाने केला गॅरेज चालकाचा खून !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ४ नोव्हेबर २०२३ | चाळीसगाव तालुक्यातील एका गावात दुरुस्त केलेली दुचाकी पुन्हा खराब झाल्याने गॅरेजवर आलेल्या एकाने माझी दुचाकी लागलीच दुरुस्त करुन दे असा म्हणून तगादा लावला यावेळी वादातून गॅरेज चालकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या खूनाच्या घटने प्रकरणी गॅरेज मालकाचा खून करणा-या दुचाकी चालकाविरुद्ध मेहुणबारे पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मेहुणबारे पोलिस स्टेशन हद्दीत बळाळ कसबे या गावी महेश संतोष बोरसे याचे मोटार सायकल दुरुस्तीचे शिवशक्ती मोटार नावाचे गॅरेज आहे. या गॅरेजवर ज्ञानेश्वर निंबा मासरे याने मोटार सायकल दुरुस्तीचे काम केले होते. मात्र त्याच्या मोटार सायकलमधे पुन्हा बिघाड झाला. त्यामुळे तो गॅरेजवर पुन्हा आला. माझी मोटार सायकल आत्ताच्या आता दुरुस्त करुन दे असा तगादा ज्ञानेश्वर मासरे याने महेश बोरसे याच्याकडे लावला. माझे काम सुरु आहे, थोडे थांब तुझी मोटार सायकल दुरुस्त करुन देतो असे महेश बोरसे याने ज्ञानेश्वर मासरे याला म्हटले. मात्र ज्ञानेश्वर मासरे याला धीर नसल्यामुळे त्याने वाद घालून महेश बोरसे यास जमीनीवर आपटून जीवे ठार केले. वाद सुरु असतांना महेश बोरसे याचे वडील वाद सोडवण्यास आले होते.
त्यांना देखील ज्ञानेश्वर याने शिवीगाळ व दमदाटी केली होती. या घटनेप्रकरणी मयत महेश बोरसे याचे वडील संतोष तुकाराम बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेहुणबारे पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. विष्णू आव्हाड करत आहेत.

Chalisgaon murder

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS