साक्षीदार | ४ नोव्हेबर २०२३ | चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे गावानजीक चाळीसगावहून कजगावकडे येत असतांना दुचाकी दुभाजकावर आदळून एका ३८ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे.
- Advertisement -
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील संतोष शिवराम पाटील हे दुचाकीने चाळीसगाव येथून कजगावडे येत असताना हिंगोणे गावाजवळ त्यांची दुचाकी ही दुभाजकावर आदळली. या अपघातात संतोष पाटील यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. संतोष पाटील हे बारामती साखर कारखान्यात कर्मचारी असल्याची माहिती घटनास्थळाहून मिळाली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
- Advertisement -