साक्षीदार | २६ नोव्हेबर २०२३ | देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात निवडणुकीची चाचपणी करीत असतांना ते धुळे शहरात आले असता त्यांनी एक मोठे विधान केले आहे.
देशात व राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून खऱ्या अर्थाने विकासाला चालना मिळाली आहे. आगामी काळातही पंतप्रधानपदी नरेंद्र माेदीच ९० टक्के लाेकांना हवे आहे. जगात सर्वाेत्तम भारत निर्माणचा संकल्प माेदींनी केला आहे. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीसयांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला एक नंबरचे राज्य बनवण्याचे काम आपल्या सर्वांना करावयाचे आहे, असे प्रतिपादन भारतीयजनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरबावनकुळे यांनी केले. चाळीसगाव राेडवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजपच्या नव्या कार्यालयाचे भूमिपूजन व हरहर महादेव तालीमचे लाेकार्पण करण्यात आले.