साक्षीदार | २१ ऑक्टोबर २०२३ | देशभरात ज्यांचे नेहमीच वक्तव्य चर्चेत राहते तर प्रत्येक नेत्याशी ज्यांचे चांगले संबध असल्याने त्यांचे राजकीय जीवन चर्चेत असते ते म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या त्यांच्या एका चित्रपटामुळे मोठ्या चर्चेत आले आहे. पण सध्या त्यांनी एक वक्तव्य केले आहे. ‘मनातले गडकरी’ या सदराखाली अभिनेते प्रशांत दामले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत घेत आहेत. या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी आनंदी राहण्याचा मंत्र दिला.
नितीनजी सर्वांना आनंदी राहायला आवडतं, तर भारताचा हॅप्पी ह्युमन इंडेक्स वाढण्यासाठी तुमच्या कल्पना काय आहेत? असा प्रश्न अभिनेते प्रशांत दामले यांनी केला. त्यावर उत्तर देताना गडकरींनी भूतानच्या पंतप्रधानांनी युनोमध्ये भाषणांची आठवण करून दिली. डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स अशी व्याख्या करून त्यांनी विचार मांडल्याचं गडकरी म्हणाले. सुखी राहण्याचा मंत्र देताना गडकरी म्हणाले. जे राज्यात बेकार होते त्यांना दिल्लीमध्ये पाठवलं. जे दिल्लीत बेकार होते, त्यांना गव्हर्नर केलं. गव्हर्नर होऊ शकले नाहीत, त्यांना अॅम्बेसिडर केले. मुळात आयुष्यात आर्थिक, सामाजिक, राजकीयदृष्ट्या काम करत राहावं. प्रयत्न करत राहावे, पण मला हेच करायचं. अशी भावना ठेवावी पण, मिळालं नाही मिळालं त्याचा विचार करू नये, आनंदी राहण्याचा हा चांगला मार्ग आहे. सगळ्यांना विनंती आहे. भविष्याचा विचार करणं सोडून द्यावं. खाली हात आये थे खाली हात जाना आहे. भविष्याची चिंता करू नये, असं गडकरी म्हणाले.