वीज तारेचा धक्का लागून १२ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू.

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

आमदार मंगेश चव्हाण भावनाविवश! कुटुंबाला धीर देत, स्वतः च्या गाडीतून मृतदेह रुग्णालयात नेला.

- Advertisement -

मयताच्या कुटुंबियांना मदत मिळवून देणार – आमदार मंगेश चव्हाण

वाकडी (साक्षीदार न्युज ) ; – शेतात बकऱ्यांसाठी चारा घेण्यास गेलेल्या १२ वर्षीय महेश अनिल सूर्यवंशी या चिमुकल्याचा शेतात तुटलेल्या वीज तारेचा धक्का लागून जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी वाकडी शिवारात घडली. या घटनेत मुलाचे वडील देखील थोडक्यात बचावले. बापाच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याचा हृदय पिवळटून टाकणाऱ्या या घटनेची बातमी वाऱ्यासारखी गावात पोहोचली. सदर घटनेबद्दल सर्वत्र व्यक्त होत आहे ,योगायोगाने त्याचवेळी एका अंत्यविधी साठी आमदार मंगेश चव्हाण हे वाकडी गावात आले होते, आमदार चव्हाण यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ क्षणाचाही विलंबना करता घटनास्थळ गाठले. घटनेचे गांभीरे ओळखून त्यांनी उपस्थित वीज वितरण कंपनी व पोलीस प्रशासन यांना सूचित करून घटनेचा पंचनामा केला. सदर प्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांनी माणुसकीचे दर्शन दाखवत, भावनाविवश होत बालकाचा मृतदेह हा चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेला. या घटनेचा हृदय पिळवटून टाकणारे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वाकडी गाव हे आमदार यांच्या मामाचे गाव असल्याने त्यांचे या गावाशी वेगळे नाते आहे. आमदार यांच्या माणुसकीचे दर्शन या निमित्ताने पुन्हा एकदा झाले आहे.

- Advertisement -

मयताच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार – आमदार मंगेश चव्हाण
झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून यात जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिल्या, महेश च्या दुर्दैवी मृत्यूने सूर्यवंशी कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, जे नुकसान झोके नुकसान न भरून निघणारे आहे. मात्र वीज वितरण कंपनी व शासनाकडून तसेच वैयक्तिक पातळीवर जास्तीत जास्त मदत मयताच्या कुटुंबियांना मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी आमदार चव्हाण यांनी दिले.

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS