केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची विमानतळावर भाजपा पदाधिकाऱ्यांतर्फे स्वागत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या प्रचाराकरिता कार्यकर्त्यांना केले संबोधीत

- Advertisement -

जळगाव (सुनील भोळे) ; – राज्यात महायुतीच्या सर्वांचा निवडून आणण्यासाठी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जळगाव जिल्हा आयोजित करण्यात आला फैजपूर येथे होणाऱ्या सभेसाठी गृहमंत्री अमित शहा हे रविवारी दुपारी जळगाव विमानतळ येथे आले असता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, सरचिटणीस अमित भाटिया, उपाध्यक्ष प्रकाश बालाणी, विजय वानखेडे, संपर्कप्रमुख विक्रम तरसोडिया, जिल्हा प्रसिद्धी माध्यम प्रमुख मनोज भांडारकर, कार्यालय प्रमुख प्रकाश पंडित, माजी नगरसेवक अमित काळे, पितांबर भावसार, मनोज बाविस्कर, रवींद्र सोनवणे उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांनी गुलापुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. प्रसंगी जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांनी गृहमंत्री अमित शहा यांना सद्गुरु वामनराव पै यांचे पुस्तक भेट स्वरूपात दिले. गृहमंत्री अमित शहा यांचे दुपारी फैजपूर येथे जे टी महाजन मैदानावर कार्यकर्त्यांना संबोधित करणारी सभा आयोजित करण्यात आली होती. गृहमंत्र्यांचा उत्तर महाराष्ट्रातील हा पहिला दौरा होता. यावेळी ते मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, अमोल जावळे, संजय सावकारे यांसह महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता आले होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

RECENT NEWS