Water Park ; शहरात लावले विना परवाना वॉटर पार्कचे बॅनर – अतिक्रमण विभाग करणार का कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Water Park जळगांव ; – मुंबई मधील घाटकोपर या ठिकाणी लावण्यात आलेल्या अवैध्य होर्डिंग मुळे १६ जणांना आपला जीव गमवावा लागला होती . त्यानंतर प्रशासनाला जाग आली होती . अनेक शहरांमध्ये अशा प्रकारे अवैध्य होर्डिंग लावण्याचे आज देखील सुरु आहे परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यास प्रशासन टाळाटाळ करत असते .
असेच काहीसे जळगांव शहरात ठिकठिकाणी बेकायदा बॅनर / होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. त्यावर कोण कारवाई करणार ? एखाद्या घटनेची जळगाव महानगर पालिका वाट बघत आहे का ? जर एकादी घटना घडली तर याला जबाबदार कोण ?

- Advertisement -

महानगर पालिका हद्दीमध्ये जर तुम्हाला बॅनर / होर्डिंग लावायचे असतिलतर काही नियम आहेत . होर्डिंग लावण्या अगोदर महानगर पालिका / ट्राफिक पोलीस या विभागाकडून आपल्याला परवानगी घ्यावी लागते , रहदारीस अडथळा निर्माण होणार याची देखील काळजी घ्यावी लागते . जर तसे कोणतेही बॅनर / होर्डिंग अथवा बॅनर आढळून आले तर संबंधित व्यक्तीवर शहर विद्रुपीकरण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत असतो.

👉🏻 Jalgaon Accident ; या कुटुंबाचा दोषी कोण

शहरात एका वॉटर पार्कचे बॅनर / होर्डिंग सर्व नियम धाब्यावर बसवून लावण्यात आलेले आहेत . या ठिकाणी साक्षीदार न्युज कडून महानगर पालिकेचे अतिक्रमण विभागाला या होर्डिंग बद्दल विचारणा करण्यात आली असता धक्कदायक माहिती समोर आली. त्यांनी सांगितले कि वॉटर पार्कचे बॅनर लावण्या करिता त्यांनी आमच्या कडे अर्ज केला आहे . परंतु आम्ही त्यांना आम्ही ट्रॅफिक पोलीस विभागाकडून परवानगीचे आणण्याचे सांगितले आहे परंतु अजून परवानगी आणली नाही परंतु त्या आधीच वॉटर पार्क चे बॅनर शहरात लागले कारण शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याचे सांगण्यात आले . कोणतीही परवानगी न घेता वॉटर पार्कचे बॅनर शहरात अवैध्य रित्या लावण्यात आले . हे बॅनर शहरात लावल्यावर महानगर अतिक्रमण विभागाला दिसले नाही का ? का दिसल्यावर कानाडोळा करण्यात आले आहे . हे बॅनर लावण्यामागे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून काही चिरीमिरी तर करण्यात आली नसेल ना अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे . हे अवैध्य बॅनर लावणाऱ्यांना कायद्याचा धाक नाही का ? जर ,महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला नागरिकांमध्ये आपापली प्रतिमा उंचवायची असेल तर तर संबंधित वॉटर पार्कच्या विरुद्ध महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम २००३ व महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा १९९५ नुसार कारवाई करण्यात येईल का ? असा प्रश्न जनमानसाकडून विचारला जात आहे . महापालिका आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई केली जाणार का ? महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी बेकायदा होर्डिंगचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पंचनामा करून संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार करतील काय ? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे . या संबंधित वॉटर पार्क विरुद्ध काय कारवाई होते बघा पुढील भागात

Water Park

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS