Mindfulness Event Jalgaon | मोबाईलपासून मनाला सुटका! जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल-ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Mindfulness Event Jalgaon जळगाव | साक्षीदार न्यूज | धकाधकीच्या दैनंदिन जीवनातून थोडा वेळ स्वतःसाठी काढत मन आणि शरीराला शांततेचा अनुभव देणारा ‘अनप्लग फ्रायडे’ हा वेगळ्या धाटणीचा उपक्रम जळगावमध्ये आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून मेहरूण तलाव परिसरातील जैन ड्रीम स्पेसेस येथील अॅम्फी थिएटरमध्ये हा अनुभवसमृद्ध कार्यक्रम पार पडणार आहे.

- Advertisement -

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे नाशिकस्थित अफ्रोशेल ड्रम सर्कल आणि माइंडफुलनेस बँड यांचे संयुक्त मार्गदर्शन. दोन्ही संस्थांनी देशभरात आतापर्यंत ५०० हून अधिक ड्रम सर्कल्स, माइंडफुलनेस आणि साउंड-हीलिंग सत्रांचे आयोजन केले असून, हजारो सहभागी या उपक्रमांतून ताणतणावमुक्ती व मानसिक शांततेचा अनुभव घेतला आहे.

तालवाद्यांचा लयबद्ध गजर, सामूहिक सहभाग आणि मार्गदर्शित ध्यानधारणा यांच्या माध्यमातून सहभागींच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे, मानसिक ताण कमी करणे आणि डिजिटल गोंगाटापासून काही काळ दूर नेणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मोबाईल, सोशल मीडिया आणि सततच्या धावपळीपासून ‘अनप्लग’ होत स्वतःशी जोडून घेण्याची ही संधी जळगावकरांसाठी विशेष ठरणार आहे.

- Advertisement -

कार्यक्रमासाठी प्रवेश शुल्क पुढीलप्रमाणे ठेवण्यात आले आहे—
१२ जानेवारीपर्यंत अर्ली बर्ड नोंदणीसाठी १७०० रुपये,
सामान्य प्रवेशासाठी १९५० रुपये,
तर पाच जणांच्या गट नोंदणीसाठी प्रत्येकी १८५० रुपये.
सर्व सहभागींसाठी रुचकर भोजनाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

या अनोख्या अनुभवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अंबिका जैन, सनम जगवानी आणि जयंतीका काबरा यांनी केले आहे.
नोंदणी व अधिक माहितीसाठी ९५५२९२२३३३, ९८२९१५५५७२ किंवा ९८५००८७००२ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

Mindfulness Event Jalgaon

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS