साक्षीदार | २७ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक जिल्ह्यात शनिवार रात्री पासून अवकाळी पाऊस सुरु झाला असून या पावसामुळे अनेक भागात शेतीचे माेठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर नंदुरबार आणि हिंगाेली जिल्ह्यात वीज काेसळल्याने दाेघांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद येथील सपना राजू ठाकरे (वय 14) ही शेतात कामावर असताना तिच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेच तिचा जागीच मृत्यू झाला. सपना सकाळच्या सुमारास शेतात कापूस वेचणीसाठी गेलेली होती. अवकाळी पावसाचे सावट यार झालेले असताना ढगांचा गडगडाट सुरू झाला. कपाशीच्या झाडाजवळ बसलेल्या सपना हिच्या अंगावर अचानक वीज कोसळली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेच दोन महिला देखील जखमी झाल्या. सपना हिचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शहादा येथे आणण्यात आला.
हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. मध्यरात्रीपासून कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील तूर, कापूस या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. औंढा तालुक्यातील चीमेगाव शिवारात शेतात थांबलेल्या तरुणावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. राजेश शंकरराव जायभाये असे मृत तरुणाचे नाव आहे. तो हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील गोजेगाव मधील रहिवासी हाेत. घरातील कर्ता तरूण गेल्याने कुटुंबासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.