back to top
गुरूवार, फेब्रुवारी 5, 2026

उत्सव विशेष ट्रेन : जळगावला असणार थांबा !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | २१ ऑक्टोबर २०२३ | अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्राधान्य देत असतात. पण सणासुदीच्या काळात रेल्वेत होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने ग्राहकांसाठी आता अमरावती- पुणे, बडनेरा- नाशिकदरम्यान उत्सव विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन ५ नोव्हेंबरपासून सुरू होतील.

- Advertisement -

अमरावती- पुणे विशेष (४ अप आणि ४ डाउन एकूण ८ सेवा) गाडी क्रमांक ०१२०९ विशेष अमरावती येथून ५ ते १९ नोव्हेबरपर्यंत दर रविवारी, बुधवारी १२.४० ला सुटेल. पुणे येथे दुसऱ्या दिवशी पावणेतीनला पोचेल. गाडी क्रमांक ०१२१० विशेष पुणे येथून ६ ते २० नोव्हेबरपर्यंत दर गुरुवार, सोमवारी साडेसहाला सुटेल. अमरावती येथे त्याच दिवशी रात्री आठला पोचेल.

थांबे : अमरावती, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्डलाइन, उरुळी, हडपसर, पुणे.
बडनेरा ते नाशिक विशेष (१४ अप आणि १४ डाउन एकूण २८ सेवा) गाडी क्रमांक ०१२११ विशेष बडनेरा येथून ६ ते १९ नोव्हेंबरपर्यंत दररोज ११ ला सुटेल. नाशिक येथे त्याच दिवशी सायंकाळी पावणेआठला पोचेल. गाडी क्रमांक ०१२१२ विशेष नाशिक येथून ६ ते ११ नोव्हेंबरदरम्यान दररोज रात्री सव्वानऊला सुटेल. बडनेरा येथे दुसऱ्या दिवशी साडेचारला पोहोचेल. या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक असे थांबे असतील.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sant Ravidas Jayanti | भडगावात जगतगुरू संत रविदास महाराज...

Sant Ravidas Jayanti भडगाव | गोरख माळी | राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भडगाव शहराच्या वतीने जगतगुरू संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात...

Jalgaon News | जळगावात बंद घर फोडून सोन्याची चोरी;...

Jalgaon News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरातील आयोध्या नगर परिसरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी...

Human Rights Association | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुपाली...

Human Rights Association अचलपूर | साक्षीदार न्यूज | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौं. रुपाली अभय माथने यांचा आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेलफेअर असोसिएशन, अचलपूर–परतवाडा यांच्या वतीने...

RECENT NEWS