Bus Acident; वापी ते यावल बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात वाहन चालकाच्या दक्षतेने भिषण जिवीतहानी टळली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावल ( प्रतिनिधी ) ; – येथील यावल आगारातुन जाणारी वापी यावल एस बस चा साक्री नवापुर गावाच्या मध्यभागी दहिवेल गावाजवळ अपघात होवुन दहा प्रवाशी जख्मी झाल्याचे वृत्त हाती आले आहे .

- Advertisement -

या संदर्भातील मिळालेली माहिती अशी यावलच्या आगारातुन वापी ( गुजरात )साठी गेलेली बस एम एच १८ बिएल३३७७ जाणारी बसचा एसटी चालक के जी शिरसाडे ( यावल आगारात कार्यरत असलेले ) चालक यांच्या ताब्यातील वापी कडुन यावल साठी परतीच्या मार्गावर असलेली एसटी बस ही सकाळी ११ते १२ वाजेच्या दरम्यान दहिवेल जवळ असलेल्या बोरकीखाडी गावाजवळ अचानक गाडीचे ब्रेक निकामी झालेल्याचे लक्षात येताच वाहनचालक के जी शिरसाडे यांनी प्रसंगवधानाने सुमारे अर्धा किलोमिटर बसला चालवित बसवर नियंत्रण ठेवल्याने मोठा अपघात टाळुन मोठी जिवितहानी टाळण्यात यश मिळवले असुन परन्तु या झालेल्या अपघातात प्रवासी जखमी झाले आहेत.

या बस मध्ये चाळीसच्या जवळपास प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती मिळाली आहे .अपघातात दहा प्रवासी जखमी झाल्याची माहीती समोर आली आहे याबाबत यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सदर एसटी बसचा अपघात झाल्याची आपल्याला माहिती प्राप्त झाली असुन अपघातस्थळी साक्री एसटी आगाराचे कर्मचारी दाखल झाले असुन ,अपघात कसा झाला याची माहिती आपण घेत असल्याचे त्यांनी सांगितले . दरम्यान या अपघातात यावलचे तिन आणी साकळी तालुका यावल येथील दोन प्रवासी जखमी झाले असुन प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त आहे.

Bus Acident

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS