back to top
शनिवार, एप्रिल 19, 2025

“गुलाबराव पाटलांचे गावोगावी जंगी स्वागत” ! – विकास कार्यांवर जनतेचा विश्वास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध ! – गुलाबराव पाटील यांचा जनतेशी संवाद

- Advertisement -

भवरखेडा येथे उघड्या जीप मधून भव्य प्रचार रॅली ठरली आकर्षण

जळगाव (सुनील भोळे )दि. 7 ; – “ग्रामविकास हेच माझे ध्येय असून गावकऱ्यांचे मिळत असलेले प्रेम व आशीर्वाद हिच माझ्या कार्याची खरी ओळख असून मी जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी जनतेशी संवाद साधताना केले. धामणगाव, खापरखेडा, नांद्रा खुर्द, सुजदे, देऊळवाडे येथे गुलाबराव पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विशेषतः लाडक्या ग्रप – ग्रुप ने बहिणींनी त्यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा देत आहे. सोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ. प. जळकेकर महाराज, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, रिपाईचे अनिल अडकमोल, भाजपचे राजू सोनवणे, अनिल सोनवणे, मन्नूभाऊ सोनवणे होते.

- Advertisement -

Village-to-village welcome

गुलाबराव पाटील यांनी या परिसरात केलेल्या सर्वांगीण विकास कामांच्या जोरावर गावकऱ्यांमध्ये अपार विश्वास दिसून येत आहे. गावांमध्ये पाणीपुरवठा सह गावं अंतर्गत मूलभूत सुविधांसह शाळा, अंगणवाड्या, आरोग्य सेवा आणि रस्त्यांची सुधारणा अशा विविध कामांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे ग्रामस्थांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत आहे.

मुख्य आकर्षण :
भवरखेडा येथे गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात उघड्या जीपमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जयघोष आणि जल्लोषाने वातावरण भारलेले होते. गावकऱ्यांच्या या उत्साहाने आणि समर्थनाने गुलाबराव पाटील यांनी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Village-to-village welcome

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी सरपंच निशिगंधा सपकाळे, अनिल उर्फ गुड्डू भाऊ सपकाळे, गलू सपकाळे, अमोल सोनवणे, गोकुळ सपकाळे, राजू सोनवणे, गणेश भालेराव, पुंडलिक पाटील, शांताराम पाटील, चंपालाल पाटील, सुरेखा सोनवणे, योगेश सपकाळे, किरण सपकाळे, अनिल मंडोरे , वासुदेव सोनवणे, प्रल्हाद पाटील, रविंद्र सोनवणे, मुकेश सोनवणे, सरपंच सुनील सोनवणे, आकाश सोनवणे, विजय सोनवणे, यांच्यासह माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Rohit Pawar | रोहित पवारांचं आवाहन: ‘फक्त ठाकरे नव्हे,...

 Rohit Pawar साक्षीदार न्युज । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच चर्चा सुरू आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील संभाव्य युतीच्या संकेतांनी राजकीय वातावरण...

Income Tax Return | आयकर रिटर्नसाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक;...

Income Tax Return साक्षीदार न्युज । नवीन आर्थिक वर्ष 2024-25 ची सुरुवात झाली असून, आता नोकरदार आणि इतर करदाते गेल्या आर्थिक वर्षातील आयकर विवरणपत्र...

UttarPradesh Mother Elopes With Daughters Father In Law |...

UttarPradesh Mother Elopes With Daughters Father In Law साक्षीदार न्युज । एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४३ वर्षीय महिलेने आपल्या मुलीच्या ४६...

RECENT NEWS