अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या फरार संशयिताला अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव :  महिलेच्या सोबत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर वाईट नजर ठवून वारंवार तिच्याकडे शरिरसुखाची मागणी करणाऱ्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून संशयित फरहान उर्फ असलम शब्बीर शेख हा फरार होता. एमआयडीसी पोलिसांनी या संशयिताला अटक केली आहे.

- Advertisement -

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला आपल्या मुलाबाळांसह वास्तव्यास असून तीचा पती २०१८ पासून घरातून कोठेतरी निघून गेलेला आहे. त्यानंतर महिलेची सन २०१९ मध्ये फरहान उर्फ असलम शब्बीर शेख याच्यासोबत ओळख झाली. तेव्हापासून तो महिलेसोबतच वास्तव्यास आहे. फरहान याची महिलेच्या अल्पवयीनमुलीवर वाईट नजर ठेवत होता, त्याने वारंवार त्या मुलीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. तसेच याबाबत कोणाला काही सांगितल्यास तिच्या आईसह भावांना मारुन टाकण्याची त्याने धमकी दिली होती.

अल्पवयीन मुलगी घरात असतांना दि. ५ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास संशयित फरहान याने त्या मुलीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी तीने दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तेव्हापासून संशयित फरहान शेख हा फरार द होता. एमआयडीसी पोलिसांनी तपासचक्रे फिरवित संशयिताला सोमवार दि. १५ एप्रिल रोजी अटक केली.

- Advertisement -

ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप. निरीक्षक रविंद्र गिरासे, पो. उप.निरी. दीपक जगदाळे, स.फौ. अतुल वंजारी, पो. हे.कॉ. राजेंद्र कांडेलकर, साईनाथ मुंढे, चंद्रकांत पाटील, इमरान बेग यांच्या पथकाने कली. सशयिताला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची १४ दिवसाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS