जळगाव : शहरातील एका परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल कृत्य करुन तीला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करीत विनयभंग केल्याची घटना दि. ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एकाविरुद्ध पोस्कोतंर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. दि. ५ एप्रिल रोजी संशयित फरहान शब्बीर शेख हा मुलीच्या घरी जावून तिच्यासोबत अश्लिल चाळे करीत तिला शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी करीत होता. तिने हि बाब कुटुंबियांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित फरहान शब्बीर शेख रा. तांबापुरा याच्याविरुद्ध पोस्कोतंर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे हे करीत आहे.