परिसरातील पर्यटनाचा विकास करण्यासाठी रोहिणी खडसे यांना मत द्या – बाळा सोनवणे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

मुक्ताईनगर (सुनील भोळे) : – चारठाणा येथील भवानी माता मंदिर परिसराचा आ.एकनाथराव खडसे यांनी इको टुरिझम व इतर योजना अंतर्गत विकास केला त्यामुळे भाविकांना, पर्यटकांना सभागृह, विश्रामगृह, वन उद्यान, तलावात बोटिंग इत्यादी सोयी सुविधा मिळाल्या. नाथाभाऊंची विकासाची परंपरा रोहिणीताई पुढे नेतील. म्हणून परिसरातील पर्यटनाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या तुतारी वाजविणारा माणूस या निशाणीसमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन बाळा सोनवणे यांनी ग्रामस्थांना केले.

- Advertisement -

Rohini Khadse
मुक्ताईनगर मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड, मधापूरी, चारठाणा येथे मतदारांच्या गाठीभेटी घेत असतांना बाळा सोनवणे मतदारांशी संवाद साधत होते. ते पुढे म्हणाले की, कोथळी येथील मुक्ताई मंदीर परिसर, चारठाणा येथील भवानी माता मंदिर परिसर यांचा नाथाभाऊंनी ज्याप्रमाणे विकास केला त्याप्रमाणे भविष्यात रोहिणी खडसे सुद्धा या ठिकाणाचा अधिक विकास करून परिसरातील पर्यटन वाढीस चालना देतील. पर्यटकांची संख्या वाढल्यास, त्यातून अनेकविध व्यवसायांची निर्मिती होवून परिसरातील तरुणांना रोजगार मिळेल. आपल्या मुलाबाळांना इथेच आपल्या मातीतच रोजगार मिळावा यासाठी रोहिणी खडसे यांच्या तुतारी वाजविणारा माणूस या निशाणीसमोरील बटन दाबून त्यांना विजयी करा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी शारदा खडसे चौधरी यांच्यासह ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा पक्ष महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS