साक्षीदार न्युज ; – मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जळगाव जिल्ह्यात शासकीय यंत्रणेमार्फत आणि विविध संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे.
त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातील जामनेर तालुक्यातील नेरी येथील एका शुध्द शाकाहारी हॉटेल येथे जनजागृती आज दुपारी करण्यात आली.
जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशन चे सहकारी आणि जळगाव जिल्हा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे मतदान जनजागृती ऑयकान मदन रामनाथ लाठी यांनी मतदानाचे महत्त्व सविस्तर पणे सांगितले आणि तेथील सर्व कर्मचारी मतदाना संदर्भात जाग़ुत आहेत. त्यांनी एकच निर्धार केला कि उन्हाचे दिवस असल्याने आम्ही सर्व जण पुर्ण परिवारास बरोबर आणि गल्लीतील, नातेवाईकांना सर्वांना सोबत घेऊन अथवा सर्वांना विनंती करुन सकाळी लवकरात लवकर मतदान करण्यासाठी विनंती करु कि , संविधानाचा सन्मान करून आपल्याला दिलेला अधिकार आणि पवित्र हक्क सोबत आपलं कर्तव्य बजाऊ.
विजय चौधरी , मनोज महाजन, कर्मचारी निखिल बिरारी, विनोद सपकाळ, सागर तायडे, देवका पाटील, नंदा भंगाळे, संगीता पाटील, रत्ना खोडपे आदी उपस्थित होते.