Municipal Corporation Candidate | प्रभाग क्रमांक ६ : उच्चशिक्षित, स्थानिक व सामाजिक बांधिलकी असलेल्या महिला उमेदवार ‘हेतल पाटील’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Municipal Corporation Candidate पत्रकार चेतन वाणी यांच्या पत्नी मैदानात : पत्रकार संघटनांचा खंबीर पाठिंबा

- Advertisement -

जळगाव | साक्षीदार न्यूज। जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत महायुती-महाआघाडीने प्रत्येक प्रभागात विजयी आणि विश्वासार्ह चेहरा देणे अत्यावश्यक बनले आहे. अशा परिस्थितीत प्रभाग क्रमांक ६ मधून हेतल महेंद्र पाटील यांचे नाव हे केवळ इच्छुक उमेदवार म्हणून नव्हे, तर महायुतीच्या विजयाची हमी देणारा पर्याय म्हणून पुढे येत आहे.

सर्वच पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असल्या तरी अंतिम यादी व महायुती-महाआघाडीचा निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. प्रभाग क्रमांक ६ मधून यंदा नवा डाव खेळला जाण्याची शक्यता असून पत्रकार चेतन वाणी यांच्या पत्नी हेतल पाटील या नशीब आजमावणार आहेत. पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारणे ठरेल, अशी स्पष्ट चर्चा कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये सुरू आहे.

- Advertisement -

स्थानिक, उच्चशिक्षित उमेदवार
बी.ई. आणि एम.एस.डब्ल्यू. अशा उच्च शिक्षणाने सज्ज असलेल्या हेतल पाटील या केवळ डिग्रीधारक नाहीत, तर समस्यांवर प्रत्यक्ष उतरून काम करणाऱ्या, जमिनीवरच्या कार्यकर्त्या आहेत. दिव्यांग, गरजू नागरिक, महिलांचे प्रश्न, आरोग्य सुविधा यासाठी त्या कायमच पुढे राहिल्या आहेत. वैद्यकीय शिबिरे, सामाजिक उपक्रम आणि महिलांसाठी तत्काळ मदतकार्य हे त्यांच्या कार्याचे ठळक उदाहरण आहे. हेतल पाटील यांचे वडील महेंद्र पाटील व संपूर्ण कुटुंब हे समाजकारणाच्या विचारधारेत वाढलेले असून कर्तव्य मूल्यांशी ठामपणे जोडलेले आहे. लेवा पाटील समाजात त्यांचा प्रभाव व शब्दाला वजन असून हा समाज प्रभागातील निर्णायक घटक मानला जातो.

पोलीस कर्मचारी, कुटुंबियांची मोठी मदार
हेतल पाटील यांचे पती चेतन रविंद्र वाणी हे गेल्या १५ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय असून क्राईम रिपोर्टिंगमुळे पोलीस प्रशासन, शासकीय यंत्रणा व राजकीय क्षेत्रात त्यांची दांडगी पकड आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी पोलीस आणि सामान्य नागरिकांच्या असंख्य प्रश्नांना वाचा फोडली असून संपूर्ण प्रभागात त्यांचा मजबूत जनसंपर्क आहे. ही ताकद थेट पक्षाच्या प्रचार यंत्रणेला बळ देणारी आहे.

प्रत्येक समाजघटकातून पाठिंबा
प्रभाग क्रमांक ६ मधील छत्रपती शाहू नगर, दत्त कॉलनी हा हेतल पाटील यांचा हक्काचा व माहेरचा परिसर आहे. टागोर नगर आणि दंगलग्रस्त कॉलनी परिसरात महिलांचा मोठा विश्वास त्यांच्या पाठीशी आहे. विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक ६ मधील एकमेव स्थानिक, उच्चशिक्षित महिला उमेदवार म्हणून हेतल पाटील यांना प्रत्येक समाजघटकातून पाठिंबा मिळत आहे. आज प्रभागातील वास्तव स्पष्ट आहे. जनतेला बाहेरून लादलेला उमेदवार नको आहे, तर प्रश्नांची जाण असलेली, स्थानिक आणि कामातून ओळख निर्माण केलेली महिला प्रतिनिधी हवी आहे. ही अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद केवळ हेतल पाटील यांच्यात दिसून येत आहे.

Municipal Corporation Candidate

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS