Warning Heavy Rain Alert ; समुद्रामध्ये मिचाँग चक्रीवादळाने तयार झाल्यामुळे ढगाळ वातावरणामुळे उत्तर भारतात कडाक्याची थंडी पसरली आहे. दिल्लीत आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा घसरला आहे. एकीकडे थंडीची चाहूलिची सुरुवात झाली असतांना . मात्र दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेले आहे .
हवामान खात्याकडून जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार, तामिळनाडूमध्ये १५ ते १७ डिसेंबर, केरळ आणि माहेमध्ये १६ ते १८ डिसेंबर, तर लक्षद्वीपमध्ये १७ आणि १८ डिसेंबरदरम्यान हलका ते मध्यम पाऊस पदन्यायाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सध्या केरळमध्ये ढगाळ वातावरण तयार झालं असून येणाऱ्या ४८ तासांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबादमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. पूर्व आसाम, अरुणाचल प्रदेश, लक्षद्वीप आणि दक्षिण केरळमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविल्यात आलीआहे. दुसरीकडे दिल्लीत तापमानाचा पारा घसरल्याने पंजाब आणि हरियाणामध्ये दाट धुके पडण्याचा देखील अंदाज वर्तविण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि त्रिपुराच्या काही भागातही धुक्यांचा प्रभाव असणार असल्याचा हवामान खात्याने कडून सांगण्यात आला आहे .
महाराष्ट्रात राहील अस हवामान ?
हवामान खात्याकडून केरळच्या काही भागात जोरदार गारपीटीचा अंदाज वर्तविल्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रातही होण्याची शक्यता आहे.येणाऱ्या पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी थंडीची वाढ होण्याची शक्यता आहे.