Gokul Mahajan, Executive Engineer, Waghur Division ; वाघूर विभागाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Gokul Mahajan, Executive Engineer, Waghur Division राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) कडून पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन

- Advertisement -

जळगाव (साक्षीदार न्युज ) :- शेततळे निविदा प्रक्रियेत गैरप्रकार करणारे वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन यांना सेवेतून निलंबित करून निविदा प्रक्रियेची चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जळगाव महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरचंद्र पवार) ने दिला आहे.यासंदर्भात जळगाव महानगर युवक पदाधिकाऱ्यांनी पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. भदाणे‌ यांची भेट घेवून निवेदन दिले.

पूर्ण व्हिडिओ बघा

👉🏽 शेततळे च्या नावाखाली ४५ लाखाची फसवणूक

निवेदनात म्हटले आहे की,तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांच्या नियंत्रणात वाघूर धरण विभाग,जळगाव यांचे अंतर्गत कोट्यवधी रुपयांचे शेततळे तयार केले जात आहे. या शेततळे कामांचा ठेका मिळवून देतो असे आमिष दाखवून वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.गोकुळ महाजन यांनी ४५ लाख रुपयांची अन्य साथीदार यांच्याशी संगनमत करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश जळगाव येथील न्यायालयाने दिनांक ०९/०७/२०२४ रोजी दिलेले आहेत.कार्यकारी अभियंता श्री.गोकुळ महाजन यांनी जिव्हीपीआर इंजिनिअर्स लिमिटेड या हैद्राबाद येथील कंपनीची शेततळे कामांची निविदा मंजूर करण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केला आहे. सदरच्या कंपनीला मध्यप्रदेश राज्यातील इंदिरा सागर परियोजना सागरचे मुख्य अभियंता यांनी काळ्या यादीत टाकले असताना ती बाब दडवून ठेवावी यासाठी श्री.गोकुळ महाजन यांनीच सदरच्या कंपनीला सहकार्य केले आहे. हा गंभीर विषय असून मर्जीतल्या ठेकेदारांना मक्ता मिळावा यासाठी कार्यकारी अभियंता श्री.गोकुळ महाजन यांनी शासकीय कर्तव्यात हयगय करून सेवा शिस्तीचे उल्लंघन केले आहे. यामुळे तापी पाटबंधारे विकास मंडळ यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होत आहे.

- Advertisement -

निवेदनात पुढे म्हटले आहे की,सातत्याने वादग्रस्त असलेले वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.गोकुळ महाजन यांनी शेततळे कामांचा ठेका मिळवून देण्याच्या नावाने आपल्या सहकारी साथीदार यांच्याशी संगनमत करून जळगाव येथील एका व्यक्तीची ४५ लाख रुपयांत फसवणूक केल्याबाबत न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने श्री.गोकुळ महाजन यांना तात्काळ सेवेतून निलंबित करून शेततळे निविदा कामांची विशेष तपास यंत्रणा मार्फत
चौकशी करण्यात यावी. याप्रकरणी ७ दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे जळगाव महानगर अध्यक्ष रिकु उमाकांत चौधरी यांच्या नेतृत्वात हितेश रवींद्र जावळे, चेतन पवार, शैलेश अभंगे, ललित चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Gokul Mahajan, Executive Engineer, Waghur Division

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS