साक्षीदार | २७ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक जिल्ह्यात हवामान बदलल्याने अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे. तर अनेक भागात शेतकऱ्यांना फटका देखील बसला आहे. काढणीसाठी आलेला कापूस, भात आणि केळी पिकाला अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याचा फटका बसला आहे. यात काढणीला आलेल्या भात पिकाच्या शेतात पाणीचपाणी साचले आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या ऑरेंज अलर्टानंतर नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू असून त्याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहेत. रब्बी हंगामातील पिकांचे मोठं नुकसान झालं असून नवापूर तालुक्यातील देवलीपाडा परिसरात भात शेतीत पाणी गेल्याने भात शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या भात शेतीत पाणी गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून सरकारने पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई द्यावी; अशी मागणी आता शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून काढणीसाठी आलेला कापूस, भात आणि केळी पिकाला अवकाळी पाऊस वादळवाऱ्याचा फटका बसला आहे. वेचणीसाठी कापूस तयार होता, मात्र पावसात भिजल्याने तो खराब झाला आहे. तर दुसरीकडे कापणीला आलेला भात आणि कापून ठेवलेला भात दोघेही खराब झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत जाहीर करावे असे मागणी शेतकऱ्यांनी केले आहे अजून तीन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.