साक्षीदार न्युज ; – ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात मा. ना श्री चंद्रकांत पाटील यांचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाचा विद्यार्थी, शिक्षक, पालक व संस्थाचालक संवाद कार्यक्रम संपन्न झाला.
उमेद अभियानात मोठा घोटाळा उघडकीस येणार ?
या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना ,शिक्षक, पालक आणि संस्थाचालक यांना सेमिनार हाॅल मध्ये एकत्रित करून ऑनलाईन वेबिनार द्वारे मार्गदर्शन परिसंवाद चे आयोजन महाविद्यालया मार्फत करण्यात आले शिक्षण सर्वांसाठी, समृद्ध महाराष्ट्रासाठी या विषयावर मा.ना. चंद्रकांतजी पाटील,मा ना अतुल सावे जी , शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने यांच्या नेतृत्वाखाली डॉ सतिश वैष्णव,प्रा हेमंत बाविस्कर, प्रदिप तायडे, यांनी केले . सुत्रसंचलन डॉ डी बी पाटील यांनी केले तर सर्व टेक्नीकल व्यवस्था डॉ जे पी नेहेते यांनी केली कार्यक्रमाला १२३ विद्यार्थी,४२शिक्षक-शिक्षकेतर वर्ग व १४ पालक उपस्थित होते.