उरुळी कांचन ।साक्षीदार न्युज । स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने येथील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र भोळे यांना स्वामी विवेकानंद नॅशनल युथ आयकॉन अवॉर्ड 2024 प्राप्त झाला आहे. गोल्डन इरा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स स्किल डेव्हलपमेंट मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ केमिकल फर्टीलायझर्स, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, उद्यम मंत्रालय V निती आयोग भारत सरकार सलग्नित गोल्डन इरा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मनीष शर्मा यांनी हा पुरस्कार वितरित केला.
समर्पित भावनेने विविध क्षेत्रात निष्काम कर्मयोगी कार्य केल्याबद्दल येथील ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार ,अपंग सेवक डॉ. रवींद्र भोळेयांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोल्डन इरा बुक ऑफ वर्ड रेकॉर्डच्या वतीने मानपत्रहि देण्यात आले.राष्ट्रीय व राज्य पातळीवर शांतता प्रस्थापित करणे, शैक्षणिक क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणे, अपंग, मूकबधिर ,मतिमंद व अनाथ यांची वैद्यकीय सेवा करणे तसेच त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी समर्पित भावनेने मदत करणे, वातावरणातील बदल यासाठी वृक्षतोड व जमिनीची धूप टिकवण्यासाठी वृक्षारोपण जनजागृती करणे , राष्ट्राचा सांस्कृतिकअध्यात्मिक वारसा टिकवण्यासाठी विविध उपक्रम घेणे, तसेच सांस्कृतिक कार्य करून शांतता प्रस्थापित करणे, व जीवन कसे जगावे आनंदी कसे राहावे , सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी गीतेतील उपदेश उपयुक्त कसे आहे,यासाठी अध्यात्म कसे महत्त्वपूर्ण आहे हे प्रवचनाद्वारे जगाला मार्गदर्शन करणे, त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी व सामाजिक जाण व भान ठेवून राष्ट्रीय लौकिकात भर घालून ,गुणात्मक विकास करून राष्ट्रऋण, समाजऋण यातून मुक्त होण्याचे महनीय कार्य डॉ.रवींद्र भोळे यांनी केले आहे. राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवणे, समर्पित भावनेने ,निरंतर, निरपेक्षपणे सेवाव्रती होऊन कर्मयोग करणे, तरुणांना प्रोत्साहित करून नवचैतन्य निर्माण करणे, तसेच दिशादर्शक ठरल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांना वरील स्वामी विवेकानंद नॅशनल युथ आयकॉन अवॉर्ड पुरस्कार 2024प्रदान करण्यात आलेला आहे .गोल्डन इरा बुकस ऑफ वर्ड रेकॉर्ड च्या वतीने देण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद नॅशनल युथ आयकॉन अवॉर्ड प्राप्त झाल्याबद्दल डॉ. रवींद्र भोळे यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.