back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

काय आ. राजूमामांना चक्क जेसीबीने घातला भव्य पुष्पहार अन् केली पुष्पवृष्टी..!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

निवृत्ती, मुक्ताई, बी.जे. नगरात ओसंडून प्रेमवर्षाव, उत्स्फूर्त स्वागतासाठी लागली रीघ

- Advertisement -

जळगाव (सुनिल भोळे) : – येथील शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्यावर प्रचारात दिवसेंदिवस चाहत्यांचे प्रेम ओसंडून वाहताना दिसून येत आहे. गुरुवारी संध्याकाळी वरद प्रतिष्ठानने बजरंग बोगदा परिसरात थेट जेसीबीने भव्य पुष्पहार घालून इतर जेसीबीच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. चाहत्यांच्या या निस्सीम प्रेमाने आ. राजूमामा भोळे काही काळ हरखून गेले होते.

- Advertisement -

आ. राजूमामा भोळे यांनी गुरुवारी दुसऱ्या टप्प्यात मानराज पार्क परिसरातील कार्यकर्ते राहुल पाटील यांचे घरापासून रॅलीला सुरुवात केली. तेथून निवृत्ती नगर, मुक्ताईनगर, एसएमआयटी कॉलेज परिसर, भिकमचंद जैन नगर, भोईटे नगर मार्गे माजी नगरसेविका लताताई भोईटे यांच्या घरी समारोप करण्यात आला. रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी महिला भगिनींकडून आ. राजूमामा भोळे यांचे औंक्षण करण्यात आले. तर मार्गातील श्री स्वामी समर्थ केंद्र, कार्तिक स्वामी मंदिर अशा विविध मंदिरात उपस्थिती देऊन दर्शन घेतले.

JCB and showered with flowers..! Rajumama

रॅलीत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, शिवसेनेचे महानगर संघटक ॲड. दिलीप पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी नगरसेवक विजय पाटील, डॉ. चंद्रशेखरपाटील, शिवसेनेचे माजी नगरसेवक मनोज चौधरी, महिला मोर्चा सरचिटणीस सविता बोरसे, भाजप मंडळ क्रमांक ५ चे अध्यक्ष शक्ती महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला महानगराध्यक्ष मीनल पाटील, भाजपचे राहुल पाटील, जिभाऊ वानखेडे, योगेश गोसावी, संकेत शिंदे, जय सोनवणे, मंगलसिंग पाटील, निताताई पाटील, वैशाली पाटील, शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, पियुष कोल्हे, उमेश सोनवणे, पप्पू भोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साजिद पठाण, विकी राजपूत, माजी नगरसेवक लता मोरे, अर्चना कदम, ममता तडवी, शोभा भोईटे, रिपाई (आठवले) गटाचे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, अक्षय मेघे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

JCB and showered with flowers..! Rajumama

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Fadnavis Support Pawar, Thackeray | फडणवीसांचा पवार-ठाकरेंना फोन, राजकीय...

Fadnavis Support Pawar, Thackeray | साक्षीदार न्यूज | जगदीप धनकड यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी...

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

RECENT NEWS