मालक बाहेरगावी असतांना चोरट्यांचा धुडगूस !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २२ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील एका परिसरातील मालक नोकरीनिमित्त पुणे येथे गेलेले दीपक विजय पाटील (33, रा. आसावा नगर, पिंप्राळा) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी टीव्ही, सीलिंग फॅन आणि तांब्याचे भांडे असा एकूण २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी शुक्रवार, २० ऑक्टोबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथे नोकरीच्या निमित्ताने दीपक पाटील (33, रा.असावा नगर, पिंप्राळा) हे राहतात. त्यामुळे त्यांचे घर १० सप्टेंबरपासून बंद होते. बंद घर पाहून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून साहित्य अस्ताव्यस्त केले व घरातील टीव्ही, चार सीलिंग फॅन आणि तांब्याची भांडी असा एकूण २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

त्यानंतर पाटील हे गुरुवार, १९ ऑक्टोबर रोजी घरी आले असता दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता साहित्य चोरून नेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी दीपक पाटील यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुशील चौधरी करीत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS